Pune Porsche Car Accident – आरोपी वेदान्त अग्रवाल च्या आजोबांना अटक

Pune Porsche Car Accident – पुणे येथील कार अपघात दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी वेदान्त अग्रवाल च्या आजोबांना अटक 

दोन सॉफ्टवेअर इंजिनीअर वर गाडी चढवून त्यांची हत्या करणाऱ्या  17 वर्षीय पुणे पोर्श चालकाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली. अग्रवाल यांच्यावर त्यांचा बिल्डर मुलगा विशाल अग्रवाल याला फरार होण्यास मदत केल्याचा आणि अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वी सांगितले होते की, वेदांत ऐवजी ड्रायव्हरला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते पुढे म्हणाले की अपघातानंतर लगेचच, चालकांना बदलण्याचा प्रयत्न केला गेला जेणेकरून वेदांत अडचणीत येऊ नये.

surendra-kumar-agarwal-pune-porsche-car-accident

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कार चालकाकडून हाताळल्या जात असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आणि सांगितले की 17 वर्षांचा तरुण वेदांत आलिशान कार चालवत होता हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे व्हिडिओ फुटेज आहेत.

सूत्रांनी सांगितले की, ड्रायव्हरचा मोबाईल काढून घेऊन दोन दिवस पिता-पुत्रांकडे ठेवले होते. त्यानंतर चालकाने पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पत्नीने पोलिसांना माहिती दिली आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर चालक दोन दिवस बेपत्ता होता, असे देखील सांगण्यात येत आहे.

या घटनेने राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील एकच खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या घटनेवरील वक्तव्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “Pune Porsche Car Accident – आरोपी वेदान्त अग्रवाल च्या आजोबांना अटक”

Leave a Comment