IPL Final 2024 चा थरार !!!!!
यंदाचा आयपीएल चा महामुकाबला (IPL Final) सन राईजर्स हैदराबाद (SRH) आणि दोन वेळा विजेता संघ कोलकाता नाइट राइडर्स (KKR) यांच्यात होणार असून ही चुरशीची लढत चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियम येथे रविवार 26 मे रोजी होणार आहे. 21 मे रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स ने सन राईजर्स हैदराबाद (SRH) वर मात करून फायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले. SRH देखील पॉइंट टेबल वरील दुसऱ्या क्रमांकाचा संघ असल्याने त्यांना फायनल मध्ये खेळायची संधी मिळाली.
त्या सोबतच SRH ने क्वालिफायर सामन्यात राजस्थान ऱ्रॉयल वर 36 धावांनी विजय प्राप्त करून आपले अंतिम सामन्यातील स्थान सुनिश्चित केले.
कोलकाता नाइट राइडर्स (KKR) चा IPL फायनल मधील इतिहास :
KKR संघ 2012 व 2014 साली कर्णधार गौतम गंभीर च्या नेतृत्वाखाली 2 वेळा विजयी तर 2021 साली एऑन मॉर्गन च्या नेतृत्वाखाली उप विजेता ठरला.
सन राईजर्स हैदराबाद (SRH) चा IPL फायनल मधील इतिहास :
SRH संघ 2016 साली डेव्हिड वॉर्नर च्या नेतृत्वाखाली एकदा विजयी तर 2018 साली केन विल्यमसन च्या नेतृत्वाखाली उप विजेता ठरला.